धरणगाव । तालुक्यातील जि.प.व पं.स. भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना अशी तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे. तालुक्यातील तीन गटांसह पं.स.च्या सहा गणांमध्ये यावेळी चुरशीच्या लढती होतील. शिवसेना व भाजपा युवती तुटल्यामुळे आरोपांच्या फैरी दोघही पक्ष एकमेकांवर जाळत आहेत. दोघही पक्षाचे प्रमुख नेते विजय आमचाच पक्षाचा होईल असे ठासून जनतेसमोर केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत असून दुसरीकडे शिवसेना हा शेतकर्यांचा पक्ष असून गोर-गरिबांचा हाल अपेष्ठा या भाजप सरकारने कशी केली नोटाबंदी, महागाई, भ्रष्ट्राचार असे प्रमुख विषय घेवून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यात तर दुसरीकडे राष्ट्रवादी आपल्या निवडणूकीचा जाहीरनामा नाही तर विकासनामा जनतेसमोर मांडत असून ग्रामीण भागाचा विकास मुलभूत सुखसुविधा, लोडशेडींग, रस्ते, पाणी, आरोग्य, या विकासाच्या मुद्यावर निवडणूकीस सामोरे जात आहेत. या दोघांचा युवती तुटल्यामुळे राष्ट्रवादीला फायदा कितपत होतो, याकडे हे लक्ष लागून आहे.
ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
धरणगाव तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मोठी ओळख आहे. विद्यमान सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. साळवा-बांभोरी या महिला राखीव गटात जि.प. माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांच्या पत्नी संगिताबाई पाटील यांची ऐनवेळी एन्ट्री झाली. पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी जाहीर केले होते. मात्र उमेदवारी मिळवण्यात जानकीराम पाटील यांना यश आले व त्यांच्यापुढे भाजपा जे उमेदवार माधुरी चंद्रशेखर अत्तरदे व राष्ट्रवादीच्या उषाबाई गोपाळ पाटील यांनी एक मोठे आव्हान उभे केले असून ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार.
राष्ट्रवादीकडून कमकुवत उमेदवार दिल्याची चर्चा
सोनवद-पिंप्री या गटात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांची पत्नी वैशाली पाटील यांच्या समोर चैताली जिनींगचे मालक व शिवसेनेने गोपाल घन:श्याम चौधरी यांना उमेदवारी देवून मोठी चुरस निर्माण केली आहे. तर राष्ट्रवादीने या गटात आपला कमकुवत उमेदवार दिल्याची एक वेगळी राजकीय चर्चेचा सुर ऐकण्यात मिळत आहे. याच तालुक्यात पाळधी-बांभोरी गटात विद्यमान सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा पुत्र प्रतापराव गुलाबराव पाटील याचीही या माध्यमातून राजकारणात एन्ट्री झाल्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. त्यामुळे चुरसीच्या या लढतीत त्यांच्या विरूध्द शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले विद्यमान जि.प.सदस्या छाया पाटील यांचे पती रमेश पाटील यांनी एक मोठे आव्हान उभे केले आहे. मंत्री पुत्राच्या लढतीची गरमागरम चर्चा व या लढतीकडे सारे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे
-प्रा. भगवान खोंडे
9604109571