धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत निलेश चौधरी विजयी !

0

धरणगाव: धरणगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणी आज सोमवारी झाली. यात सुरुवातीपासून शिवसेनेचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी आघाडीवर होते. अखेर त्यांचा विजय झाला आहे.
३९५२ मतांनी त्यांचा विजय झाला आहे.

धरणगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण ५७.७३ टक्के मतदान झाले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या या नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपसह राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून नीलेश सुरेश चौधरी, भाजपकडून मधुकर बन्सी माळी तर राष्ट्रवादीकडून नीलेश भागवत चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हाजी शेख इब्राहिम उमेश, जानकीराम माळी, संजय एकनाथ माळी, महेंद्र सुभाष पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात होते.