धरणगाव महाविद्यालयात आमदार डॉ.सुधीर तांबे यांचा सत्कार सोहळा

0

धरणगाव । येथील इंदिरा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक संघ, टिडीएफ व विविध शिक्षक संघटना, संस्थेचा वतीने पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयाजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी कॉग्रेस कमिटी सचिव डि.जी.पाटील हे होते तर पी.आर.हायस्कूल संस्थचे अध्यक्ष डॉ.अरूण कुलकर्णी, संचालक अजयभाऊ पगारीया, जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ, तालुकाध्यक्ष सी.के.पाटील मुख्याध्यापक एस.एस.पाटील, डी.एस.पाटील, टी.डी.एफ.चे शरद बन्सी व्यासपीठावर उपस्थितीत होते. यावेळी तालुक्यातील सर्वच माध्यमिक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यायचा वतीने डॉ.सुधीर तांबे यांचा गौरव करण्यात आला.

शिक्षक व संस्थाचालक मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
विविध शिक्षक संघटना शैक्षणिक संस्था यांचा वतीने सत्कार करण्यात आला. सलग तीन वेळा विजयाची हाट्रिक साधणारे डॉ.तांबे यांचे शिस्त बध्द नियोजन कार्यकत्याची मेहनत व शिक्षकांची विविध प्रश्‍नांची व पदवीधरांची जान असलेले मतदार संघात सतत संपर्क ठेवून शिक्षकांचा सुख दु:खात सहभागी होऊन हक्कासाठी आंदोलन करणारे डॉ.तांबे हे एक आमदार आहे. अशी भावना शिक्षक व संस्थाचालक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांचाविषयी भावना व्यक्त केल्या. सत्कार समारंभ कार्यकमात गावातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

माझ्यावर मोठी जबाबदारी – आमदार तांबे
आमदार डॉ.तांबे म्हणाले की, माझ्यावर आपण पुन्हा एक मोठी जबाबदारी व आपल्यासाठी काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आपला विश्वास हा लाख मोलाचा असून मी सदैव शिक्षकांचे प्रश्‍न विना अनुदानीत शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. शाळा महाविद्यायांना अनुदान मिळवून शाळांचा दर्जा कसा उचवता येईल व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल यासाठी मी प्रामाणिक काम करेल कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.शरद बन्सी यांनी मानले.

शिक्षक संघटनेचे निवेदन
शिक्षक संघटनेचा वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले. या मागणीत नॉन सॅलेरी ग्रट मिळावी, शाळा मुल्यांकनास पात्र अश्या तुकड्याना अनुदान मिळावे, जुनी पेंशन योजना शासनाने सर्वांना लागु करावी, संचमान्यता पूर्वीप्रमाणे असावी अश्या अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मांडले की, पदवीधरांना बॅकेकडून कर्ज सुविधा लवकर उपलब्ध करणे सुशिक्षीत बेरोजगाराचे प्रश्‍न सोडवावे असे आव्हान केले. यावेळी तालुक्यातील शिक्षण संस्थेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.