धरणगाव महाविद्यालयात क्षयरोग मुक्त भारत कार्यक्रमाचे आयोजन

0

धरणगाव । येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभाग व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजात जनजागृतीसाठी या वर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. दिनेश खेताडे, सरकारी रूग्णालय धरणगाव यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहून या भयानक आजार व त्याची लक्षणे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी जीवनात आहार, आचार व विचार महत्वाचे असतात म्हणून उत्तम सकस आपले आहार घेवून उत्तम आरोग्य ही माणसाची खरी कमाई आहे असे प्रतिपादन केले.

सोशल मिडीया या विषयावर व्याख्यान
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वा.ना. आंधळे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एरंडोल महाविद्यालयाच्या प्रा. शोभना कोळी ह्या प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आजच्या 21व्या शतकात स्पर्धेच्या युगात सोशल मिडीया सारख्या एक काळाची गरज आहे. व तिचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो. विद्यार्थ्यांनी चांगल्या विधायक गोष्टीसाठी तसेच समाज उपयोगी जनजागृती योग्य तेवढा उपयोग करावा व त्याचा सकारात्मक दृष्टीने विचार करून सोशल मिडीयाकडे पहाण्याचा दृष्टीने विचार करावा असा विचार त्यानी आपल्या व्याख्यानातून प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख डॉ.ए.ए.जोशी यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सौ.बिरारी, डॉ. कांचन महाजन, डॉ.एस.एस.पालखे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्षयरोग मुक्त भारत कसा करण्यासाठी झाली चर्चा
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वा.ना.आंधळे तर प्रमुख पाहुणे शिंपी यांनी क्षयरोगची लक्षणे व त्याचा औषधोपचार याविषयी माहिती सांगितली तसेच धरणगांव रूग्णालयातर्फे दिल्या जाणार्‍या सुखसुविधा याविषयी विस्तृत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांनी क्षयरोग मुक्त भारत कसा करता येईल आपल्या खास कवि शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख डॉ.ए.ए.जोशी, डॉ.एस.एस.पालखे, डॉ.डी.आर.बोंडे, डॉ.के.डी. महाजन, डॉ. एस.एम.उपासणी, प्रा. मोनिका कट्यारे उपस्थित होते.