धरणगाव महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक परिचय मेळावा

0

प्राचार्य डॉ.टी.एस.बिराजदार यांनी महाविद्यालायाविषयी दिली माहिती

धरणगाव । २१ सप्टेंबर २०१७ बुधवार रोजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नॅक मूल्यांकन निमित्त माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण कुळकर्णी तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अरुण कुळकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद उहाळे, संचालक अजयभाऊ पगारी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस. बिराजदार, पी.सी. आबा पाटील, डी.जी.पाटील, सी.के.पाटील, डी.आर. पाटील, आर.एन.महाजन, उपप्राचार्य, डॉ.के.एम. पाटील, नॅक समन्वयक डॉ.प्रविण बोरसे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संजय शिंगाणे तर कार्यक्रमाचे आभार प्रा.जोशी यांनी मानले. यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी यांचा स्वागत व सत्कार ही संस्थेच्या व महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बी. एस. शेख, प्रा. इ.के. कासार, प्रा. सौ. छाया, प्रा. केंद्रे, प्रा. वारडे, प्रा. पालखे, आदिंनी परिश्रम घेतले.

माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर पाटील यांनी केले तर महाविद्यालयाने आतापर्यंत शैक्षणिक विकासाची घौडदौड व ग्रामीण भागातील एकमेव महाविद्यालय असून विद्यार्थी केंद्रीत दिल्या जाणार्‍या शैक्षणिक सुखसुविधा विषयी विस्तृत माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एस.बिराजदार यांनी दिली. नॅक मूल्यांकन आवश्यकता व संस्थेचा असणारा मोठा सहभाग या विषयी माहिती नॅक समन्वयक डॉ.प्रविण बोरसे यांनी सांगितले. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी डॉ.आर.आर. पाटील, पी.सी.आबा पाटील, डी.जी. पाटील, सी.के.पाटील, प्रा.आर.एन. महाजन, संजय महाजन, भानुदास विसावे, सुनिल चौधरी, प्रा. अविनाश बडगुजर आपल्या स्मरणातील कॉलेज व भूतकाळातील घटना व महाविद्यालयीन जिवनाचा उपभोगलेला आनंद काही प्रसंग मान्यवरांनी मांडून वातावरण प्रफूल्लीत व हास्याचे फवारे उडाले व शैक्षणिक जास्तीत जास्त द्यावे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधावा व्यावसायिक कोर्स आणून ग्रामीण भागातील मुलांना रोजगार, स्वंय उदयोग प्रेरणा मेळावी यासाठी नव नविन योजना आणून विकास साधावा मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुण कुळकुर्णी आपल्या अध्यक्षिय भाषणात म्हणाले की इ.सा. १९७१ महाविद्यालय सुरु झाले तेव्हा ७० विद्यार्थी प्रवेश देऊन सुरु झालेले महाविद्यालयात आज ३००० विद्यार्थी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण होत आहेत. कै. परशुराम रायचंद पगारीया यांनी लावलेले वृक्ष आज वटवृक्ष रुपात आले. यात संस्थेचा व कर्मचारी तालुक्यात जनतेचे मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व्यक्तिमत्व, चांगला संस्कार या ज्ञानमंदिरात, विद्यार्थ्यांच्या आशा आकांश त्यांच्या सुप्त कलागूणांना वाव दिला जात असून भविष्य काही नव-नविन शैक्षणिक, कोर्सेस आणून पूर्तता करण्याचा प्रयत्न करु, असे विचार व्यक्त केले.