धरणगाव येथे बालाजी मंडळातर्फे कुस्त्यांची दंगल

0

धरणगाव। येथील श्रावण महिन्याच्या निमित्ताने मरीआई यात्रानिमित्त प्रत्येक मंगळवारी कुस्त्यांचे दंगलीचे आयोजन बालाजी मंडळाकडून आयोजित करण्यात येत असते. अशीच एक मानाची कुस्ती मा. खा.ए.टी. नाना पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील, शिवसेना जिल्हा अध्यक्ष गुलाबराव वाघ, ज्ञानेश्‍वर महाजन, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचे वडील नथ्थु चौधरी, पवन सोनवणे, डॉ.व्ही.आर.तिवारी, मा. नगराध्यक्ष सुरेश चौधरी, संजय महाजन, नगरसेवक ललित येवले, जिवय महाजन, सुनिल चौधरी, धानोरे येथील सरपंच भगवान महाजन, राजु न्हायदे यांची प्रमुख उपस्थित मानाची मल्लांची कुस्ती लावण्यात आली. कै. भिलाभाऊ सोनवणे यांच्या स्मरणार्थ एक लाखाची कुस्ती ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते लावण्यात आली. यावेळी कुस्ती सारख्या खेळाला महत्व मिळावे. व युवकांनी आपले शरीर मेहनतीने व कसरत करुन विजय चौधरी यांचे सारखे काम करण्याचे आवाहन खा.पाटील यांनी केले.

विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव
यावेळी त्यांनी कुस्तीसाठी भव्यदिव्य असे स्टेडियम शहरात उभारण्यात येईल. अशी घोषणा करुन 25 हजार देणगी म्हणून जाहीर केले. धानोरे येथील सरपंच यांनी मंडळास 51 हजार रूपयांची देगणी दिली. तसेच पी.सी.पाटील यांनी 11 हजार देणगी जाहीर केली. महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचे वडील नथ्थु चौधरी, जिल्हाध्यक्ष शिवसेना गुलाबराव वाघ, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चौधरी, ज्ञानेश्‍वर महाजन, माळी महासंघ अध्यक्ष यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. यावेळी जळगाव धुळे, नंदुरबार, जिल्हा तसेच एम.पी. यु.पी. राष्ट्रातून पहेलवान मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी अनमोल सहकार्य केले. तर पंच म्हणून प्रकाश पाटील, नारायण महाजन, देवा महाजन, यांनी काम पाहीले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय महाजन व भानुदास विसावे यांनी केले.