धरणगाव येथे शिवसेनेतर्फे शेतकरी कजर्मुक्तीचा नारा

0

धरणगाव : जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्याने बुधवारी 31 मे रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी सरकारमधीलच शिवसेनेच्यावतीने हे आंदोलन म्हणजे सरकारला घरचा आहेर होता अशी चर्चा यावेळी झाली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोनि डी.एस.पाटील यांना देण्यात आले. यावेळी आमदार अनिल गोटे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळेस जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, सभापती सचिन पवार, तालुकाप्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक पप्पू भावे, वासू चौधरी, विलास महाजन, भागवत चौधरी, नंदू पाटील, सुरेश महाजन, जितू धनगर, विजय महाजन, सुनील चौधरी, धीरेंद्र पुरभे आदी उपस्थित होते.