धरणगांव । देशात पतंप्रधानांनी पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा बंदी केल्यानंतर सोबत रोकड ठेवणार्यांची संख्या कमी झाली आहे. लग्नसराई तसेच शेती मशागत सुरु असल्याने सर्वांना पैशाची गरज भासत आहे. मात्र धरणगांव येथील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक अशा सर्वच बँकाचे एटीएम मशिन बंद अवस्थेत पडले आहे. पैसे उपलब्ध होत नसल्याने एटीएम मशिन फक्त नागरिकांसाठी ’शो पीस’ ठरत आहे.
दरम्यान धरणगांव येथील भाजप पदाधिकार्यांनी बँक अधिकार्यांची भेट घेऊन लवकरात लवकर एटीएम सुरु करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला आहे. यावेळी कैलास माळी, अॅड.शरद माळी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. बँक अधिकार्यांनी आठ दिवसात सर्व एटीएम सुरळीत करण्याची ग्वाही दिली आहे.