धरणगाव । येथील सावित्रीबाई फुले उड्डाण पूलावर हाय मास्ट लॅम्प लावल्यापासून उड्डाण पूल हा गावातील लोकांना आकर्षीत करीत असून ते मॉर्निग वाक व रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर गावातील महिला पुरुष या येत असतात. या ठिकाणी फिरायला रात्री 7 व 11 वाजेपर्यंत नागरीकांची मोठया प्रमाण वर्दळ असते. दोन दिवसांअगोदर फिरायला आलेल्या एका महिलेचे टवाडखोर मुलांनी नाव घेतले असता या ठिकाणी तो वाद वाढू न देता तितेच मिटविण्यात आला. परंतु गावातील वरिष्ठ नागरिक, महिला, मुली या पुलावर फिरायला येत असतात त्या ठिकाणी टवाडखोर मूले मुलींची टिंगल करत असून याच पुलावर दारू पिण्याची गर्दी होत असल्याची ओरड होत असून सुरक्षा म्हणून प्रशासनाने महिलांच्या संरक्षणासाठी या पुलावर रात्रीच्या वेळी एक महिला पोलीस कर्मचारीही नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महिलांना कडून होत आहे.