धरणगाव । अवाजवी वीजबिले, हलक्या दर्जाचे मीटर त्वरित बदलवावे तसेच रिडींगनुसार बिले, या मागण्यासाठी आज सकाळी 10 वाजता विद्युत मंडळावर शिवसेनेतर्फे शिष्टमंडळ जाणार आहे. हरिभाऊ महाजन, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुकाप्रमुख गजानन पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन, सुरेश चौधरी, पी.एम.पाटील, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, माजी सभापती सचिन पवार, जि.प.सदस्य, पं.स सदस्य उपस्थित राहतील. शिवसेना संपर्क कार्यालय, शंकर सॉमिलसमोर धरणगाव शहरातील नागरिकांनी एकत्र जमावे असे आवाहन शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी केले आहे. युवा सेना शहरप्रमुख संतोष महाजन, भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख पराग चव्हाण यांनी केले आहे.