नवी दिल्ली । भारत ऑस्ट्रेलिया यांच्या चौथी कसोटी धरमशाला येथे होणार आहे.हि कसोटी दोन्ही संघ जिकण्यासाठी खेळणार आहे.यात काहीच शंका नाही. हा सामना निर्णय असून येथील मैदान वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेली आहे.मात्र खेळपट्टीबाबत भारतीय संघामध्ये अस्वस्थता राहिल असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने केले आहे.यापुढे बोलतांना तो म्हणाला की, धरमशाळेचे मैदान चांगले आहे. यापुवी मी एकदा हे मैदान पाहिले आहे.त्यावेळी धरमशाळेच्या मैदानावर गवत होते.
त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढले आणि भारतीय संघातील खेळाडूमध्ये काही प्रमाणात अस्वस्थपणा असेल. अखेरच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्टीव्ह ओकीफेच्याऐवजी जॅक्सन बर्डला संधी मिळू शकते, असे मत जॉन्सने व्यक्त केले. याबाबत तो म्हणाला, की ‘माझ्या मते ऑस्ट्रेलियाने या सामन्यात एका फिरकीपटूसह खेळावे. फिरकी गोलंदाजांनी मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्यांच्यावर येथे चांगल्या कामगिरीचा दबाव होता. मालिकेत दोन्ही फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असल्याने कोणाला संधी द्यावी, हे ठरवणे अवघड आहे. परंतु माझ्या मते अनुभवाला प्राधान्य द्यावे.”बर्डला अंतिम सामन्यासाठी प्राधान्य देताना जॉन्सनने सांगितले, “अंतिम सामन्याची खेळपट्टी ऑस्ट्रेलियाप्रमाणे असल्यास मला वाटते, की लिऑनला अंतिम संघात घेऊन तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून बर्डला संधी द्यावी.
कसोटीसाठी धरमशाला सज्ज!
धौलाधर पर्वतराजीत वसलेले , निसर्गाच्या सान्निध्यात उभारण्यात आलेले धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे (पीएचसीए) स्टेडियम जगातील 114वे आणि भारतात 27 वे कसोटी केंद्र बनण्यास सज्ज झाले आहे. शनिवारपासून या स्टेडियममध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जाईल. याआधी तीन वन-डे तसेच आठ टी-20 सामन्यांचे आयोजन येथे झाले. भारताने तीनपैकी दोन वन-डे जिंकले तर एका सामन्यात पराभव पत्करला.