जळगाव। ‘वैज्ञानिक जाणिवा’ या नावाने प्रकल्प राबवण्यास शासनाने अनुमती देऊ नये, अशी मागणी हिदुंत्ववादी संघटनातर्फे, प्रशांत जुवेकरसह राजू ननावरे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. शासनाकडे नक्षलवादात अंनिस गुंतल्याची माहिती पुराव्यासह अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी या वेळी दिली. वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाच्या नावे लहान मुलांकडून पैसा गोळा केले जात असल्याचे ताशेरे सातारा धर्मादाय आयुक्तांनी अंनिसच्या आर्थिक ताळेबंदावर मारले असल्याकडे मोहन तिवारी यांनी लक्ष वेधले.
यांची होती उपस्थिती
याचप्रकारे हा प्रकल्प राज्यातील कोणत्याही शाळेत राबवला जाऊ नये, अशी मागणी आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजपचे मनपा गटनेते सुनील माळी, शिवसेना उपमहानगर प्रमुख मोहन तिवारी, अधिवक्ता, निरंजन चौधरी, बजरंग दलाचे राजू ननावरे आणि स्वराज्य निर्माण सेनेचे महेश सपकाळे हे उपस्थित होते.