धर्मशाळेच्या स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना

0

धर्मशाळा । धर्मशाला येथील मैदानावर प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिमाचलप्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटीला प्रारंभ होणार आहे. या कसोटी क्रिकेटसाठी भारतीय व ऑस्ट्रेलिया संघांनी कसून सराव केला. या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सराव शिबीरातून वेळ काढून दलाई लामा यांची भेट घेतली. कसोटी सामना म्हटले की तो पाच दिवस चालतो. त्यामुळे सामना रंगात आल्यानंतर खेळाडूंना रात्रीची झोप लागणे कठीण होऊन बसते. नेहमी उद्याच्या दिवसाची चिंता लागून असते. अशावेळी शांत झोप कशी मिळवावी याचा सल्ला दलाई लामा यांनी क्रिकेटपटूंना दिला.

दलाई लामांनी साधला सांवाद
दलाई लामा यांची भेट घेऊन अतिशय आनंद झाला. त्यांनी दिलेले सल्ले आम्ही आमच्या दैनंदिन जिवनात लागू करू शकलो तर आनंदच होईल. मैदानात कितीही दबाव असला, खेळ कितीही त्रासाचा असला तरी शेवटी तुम्ही वैयक्तिक आयुष्यात किती सुखी आहात हे खूप महत्त्वाचे ठरते. अशावेळी तुम्हाला मनाची शांती लाभणे खूप गरजेचे असते असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ म्हणाला.हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम दलाई लामा यांच्या राहत्या घराच्या अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना सरावातून वेळ काढून दलाई लामा यांची भेट घेणे सहज शक्य झाले . धर्मशालाच्या स्टेडियमवर यंदा पहिल्यांदाच कसोटी सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.