आझमी आणि त्यांच्या सुरात सूर मिसळणारे एमआयएमचे वारिस पठाण यांना भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांनी उत्तर दिले असले, तरी देशविरोधी मानसिकता वारंवार प्रकट करणार्यांना केवळ शाब्दिक उत्तर देणे आता पुरेसे नाही, हे लक्षात घ्यायला हवे. इस्लामच्या आडून राष्ट्रद्रोह करणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी. प्रसंगी त्यासाठी कायदा करावा; मात्र हा देशद्रोह आता सहन करू नये.
ऊंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला होणारा विरोध तसा नवा नाही. देशप्रेमाच्या उत्कट भावातून वर्ष 1876 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांना ‘वंदे मातरम’चे दैवी शब्द स्फुरले आणि पुढे स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात हे दोन शब्द जणू राष्ट्रभक्तीचा मंत्रच झाले. अनेक क्रांतिकारकांनी फाशी जातानाही ‘वंदे मातरम्’चा नारा दिला. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या दोन प्रेरणादायी शब्दांच्या पदरी उपेक्षाच पडली. मुसलमानांच्या अनुनयासाठी वंदे मातरम’च्या पाच कडव्यांपैकी शेवटच्या तीन कडव्यांवर अघोषित बंदी आणली गेली. ऊंदे मातरम् म्हणणे हा देशभक्तीचा निकष नसला, तरी वंदे मातरम् न म्हणणे हा राष्ट्रद्रोहाचाच निकष आहे, अशी सर्वसामान्य भारतीयांची भावना आहे. हे धर्मांध येथील माती, हवा, पाणी यांचा उपभोग घेणार, मेल्यानंतरही इथल्याच मातीत गाडले जाणार; पण भूमीला मात्र वंदन करणार नाहीत! हा कृतघ्नपणा सहन केला जाऊ शकत नाही.
मुस्लिमांच्या विरोधामागे हिंदूद्वेषच
अबू आझमी, ओवैसी आणि कंपू यांच्याकडून ‘’इस्लाममध्ये अल्लाव्यतिरिक्त कुणाचीही पूजा मान्य नाही. त्यामुळे वंदे मातरम् म्हणणार नाही”, असे सांगितले जात असले, तरी ही कारणे फसवी आहेत. वंदे मातरम’ला होणार्या विरोधाची प्रामुख्याने (वरकरणी) तीन कारणे सांगितली जातात. पहिले म्हणजे इस्लाममध्ये कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती यांची पूजा करण्यास बंदी आहे. खर्या (?) मुस्लिमानेे अल्लाव्यतिरिक्त कुणाही समोर झुकू नये, अशी इस्लामची शिकवण आहे, असे सांगितले जाते. गीतामध्ये मातृभूमीला वंदन केले असल्याने ते गीतच इस्लामविरोधी आहे, असा विरोधकांचा दावा आहे. दुसरे कारण म्हणजे या गीतामध्ये मातृभूमीचे दुर्गादेवीच्या (म्हणजे हिंदूंच्या देवतेच्या) रूपात वर्णन केले आहे आणि तिसरे कारण म्हणजे हे गीत ज्या आनंदमठ कादंबरीमध्ये आहे, त्या कादंबरीमध्ये मुस्लिमांविरोधात लिखाण केले आहे. या तीन कारणांवरूनच विरोध करणार्या मुस्लिमांमध्ये कट्टरता आणि धर्मांधता किती टोकाची आहे, हे दिसून येते.
थोडासा विचार केला, तरी विरोधामागची कारणे सपशेल अतार्किक आहेत, हे लक्षात येईल. जी मातृभूमी आयुष्यभर आपला भार सहन करते, अन्नाची मूलभूत आवश्यकता पूर्ण करते, निवारा देते त्या भूमीला वंदन करण्यात कमीपणा कसला? मुस्लिमांना काही उदबत्ती, धूप आणि फुले घेऊन मातृभूमीची पूजा करण्यास सांगितले नाही, तर केवळ मातृभूमीविषयी कृतज्ञताभाव असणारे गीत गाण्यास सांगितले आहे. मात्र, त्यालाही अबू आझमी नकार देतात. यावरूनच अबू आझमी यांची मनोभूमिका किती संकुचित आणि बुरसटलेली आहे, हे लक्षात येते. हिंदूंच्या देवता (दुर्गादेवी)मुस्लिमानांना चालत नाहीत, यावरून मुस्लीम सर्वधर्मसमभाव मानत नाहीत, हे सिद्ध होते. आनंदमठ कादंबरीमध्ये मुस्लिमांचे चुकीचे चित्र रेखाटले जात असल्याचे सांगितले जात असले, तरी तो केवळ कांगावा आहे. कारण कुणीही आतापर्यंत त्या पुस्तकातील सूत्रे पुराव्यासहित खोडून काढलेली नाहीत. त्यामुळे वंदे मातरम’च्या विरोधामागे वरकरणी काहीतरी कारणे सांगितली जात असली, तरी मूळ कारणे अंतःकरणातील फुटीरतावादी वृत्ती आणि राष्ट्रद्रोह हीच आहेत, हे न कळण्याइतकी जनता खुळी नाही.
अर्थात् इशरत जहाँप्रकरणी सहानुभूती बाळगणार्या, देशद्रोही झाकीर नाईक पसार झाल्यानंतर त्याची मुंबईतील शाळा चालवण्यास घेणार्या तसेच 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेला विरोध करणार्या आझमीसारख्यांकडून अजून कोणती अपेक्षा करणार ? त्यामुळे सरकारने आता अशा देशद्रोही वृत्तीच्या मंडळींवर कठोर कारवाई करावी. ज्याप्रमाणे पाकिस्तानातील आतंकवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केले, त्याप्रमाणे देशांतर्गत गद्दारांवरही सर्जिकल स्ट्राइक करून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक पाऊल टाकावे. वंदे मातरम्!
– अभय वर्तक
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387
abhayvartak@gmail.com