धर्माधिकरी,कार्यतत्पर अधिकारी
नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता उदय मुकुंद धर्माधिकारी हे 30 सप्टेंबर रोजी नियत वयोमानानुसार नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत या निमित्ताने
त्यांचा जीवन प्रवास ….
नाशिक महानगरपालिकेत सेवा करीत असताना उदय धर्माधिकारी यांनी आपल्या अभियंता पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
कोल्हापुर ,ओरंगाबाद, नागपुर , व रत्नागिरी येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. मात्र जास्तीत जास्त शिक्षण त्यांचे कोल्हापुर येथे झाले
त्यांचे वडील मुकुंद धर्माधिकारी हे विज्ञान संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ होते तर त्यांच्या आईचे नाव शुभदा मुकुंदराव धर्माधिकारी असून बहिणीचे नाव अमिता अजय ब्रह्मे आहे.
उदय धर्माधिकारी यांचे वडिलांची शासकीय नोकरीमुळे सतत बदली होत असल्याने उदय धर्माधिकारी यांचे शिक्षण देखील वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांचे तिसरी पर्यंतचे शिक्षण हे नागपूर येथील धर्मपेठ शाळेत आणि लक्ष्मी नगरच्या विमलताई परांजपे शाळेत झाले, नंतर त्यांच्या वडिलांची बदली औरंगाबाद अर्थात आत्ताचे संभाजीनगर येथे झाल्याने चौथी ते सहावी पर्यंतचे शिक्षण हे सरस्वती भुवन या विद्यालयात झाले.
उदय धर्माधिकारी हे लहानपणापासुनच अतिशय शांत स्वभाव व अभ्यासु वृत्तीचे होते.
त्याकाळात इयत्ता चौथीला बोर्डाची परीक्षा होत असे.अश्या काळात ते
बोर्डात पहिले आले होते .
त्यानंतर वडिलांची बदली कोल्हापुरला झाल्याने त्यांचे पुढील शिक्षण विद्यापीठ हायस्कूल मध्ये झाले. विशेष म्हणजे त्या हायस्कूलमध्ये प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि त्यांच्या बहिणींनी देखील शिक्षण घेतले आहे, तसेच प्रसिद्ध
शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ,
प्रसिद्ध गायक सुधीर फडके हे देखील या शाळेतीलच कोल्हापूरच्या विद्यापीठ हायस्कूल चे माजी विद्यार्थी आहेत
त्यानंतर उदय धर्माधिकारी हे बारावी विज्ञान
चांगल्या मार्क्सने पास होवुन त्यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरींग सांगली मध्ये बी ई सिव्हिल चा शिक्षण घेतले.
१९८२ ते १९८६ या वर्षाच्या काळात शिक्षण घेऊन अभियांत्रिकी पदवी मिळवली
या नंतर जळगाव येथे व काही काळ नाशिकला नौकरी केली.
नाशिकला महानगर पालिकेची जाहिरात वाचण्यात आली
त्यानंतर नविन आयुष्याला सुरुवात झाली.
महापालिकेच्या लेखी परिक्षेत प्रथम क्रमांकाने पास झाले
व महानगरपालिके मध्ये रुजु झाले
महानगरपालिकेमध्ये रोज वेगवेगळे आव्हान असतात, प्रत्येक फाईल ही वेगवेगळी असते , अश्यावेळी
आव्हानात्मक काम करायला उदय धर्माधिकारी यांना आवडायला लागले.
वेगवेगळ्या विभागात बदल्या झाल्या ,
पण कधीही बदलीचा बाऊ केला नाही
कधी बदली रद्द करुन घेतली नाही व
कधीच नंतर त्या विभागाकडे मागे वळुन बघितले नाही.
प्रत्यक्ष जाउन साईट बघितल्या शिवाय कुठल्याही फाईल वर सही करायची नाही असा त्यांचा हट्ट असायचा.
प्रत्येक विभागात खुप शिकण्या सारखे असते, नविन गोष्टीची माहिती होते .
नविन अधिकारी लोकांच्या हाताखाली काम करायला,
त्याच्यांकडुन शिकायला ,
सुक्ष्म निरीक्षण करुन
आपल्या मध्ये कसे बदल करता येतील
असा सकारत्मक द्रुष्टिकोम ठेवुन धर्माधिकारी यांनी काम केले.
प्रशासनाच्या विरुध्द जायचे नाही,
नेहमी संस्थेच्या हिताचा प्रामणिक पणे विचार करुन निर्णय घ्यायचा ह्यासाठी त्यांचा आग्रह असायचा !!
त्यांना टेबलावर फाईल्स पडुन राहीलेल्या आवडत नसे
प्रत्येक फाईलवर लवकर निर्णय घेऊन पुढे पाठवायची असा त्यांचा आग्रह होता.
अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न , पाणी प्रश्न , सामान्य नागरीकांचे प्रश्न त्यांनी सोडवले .
वैयक्तिक जीवनात व सामाजिक जीवनाची सरमिसळ केली नाही
स्वताची तब्बेत ऊत्तम ठेवण्या साठी
ऊत्तम टेबलटेनिस व बॅंडमिंटन ते आजही खेळतात
त्यांना पर्यटनाची मोठी आवड आहे.
आता संपुर्ण भारत व परदेशात जाऊन पर्यटन करण्याचा त्यांचा मानस आहे
सदगुरु आपल्या पाठिशी असतात आणि तेच कठिण प्रसंगात योग्य निर्णय घ्यायला आपल्याला मदत करतात असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
उदय मुकुंद धर्माधिकारी यांना पुढील आयुष्याच्या सुखकर वाटचालीसाठी, ऊत्तम आरोग्यासाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा!