पंढरपूर-भाजपतर्फे महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही महाजनादेश यात्रा धुळे येथे गेल्यानंतर मंत्रालयाच्या आवारात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील या शेतकर्याच्या पत्नीला आणि कुटुंबियांना जी वागणूक दिली ती दुर्दैवी आहे,अशी खंत खा.सुप्रिया सुळे यांनी केली.एवढेच नाही तर आणीबाणीबाबत बोलणारा भाजपा हा पक्ष आता छुपी आणीबाणी राबवतो आहे असाही आरोपही त्यांनी केला.त्या पंढरपूर येथे बोलत होत्या.
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पन्नास नावे आहेत, मात्र अजित पवारांचे नाव टीआरपीसाठी पुढे केले जाते आहे असा टोला राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांनी लगावला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे,असेही त्या म्हणाल्या.