मुंबई: शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्युमुळे सरकारचे धाबे दणाणले असून आता सरकार त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हालचाली करत आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत लेखी पत्र देखील दिले आहे.
एका आठवड्यात जमिनीचं फेरमुल्यांकन केलं जाणार आहे. त्यानंतर पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्क्म व्याजासह देणार असल्याचं आश्वासन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. तसेच, जमीन संपादनाची प्रक्रिया 2009 ते 2015 पर्यंतची आहे. 199 हेक्टर जमिनीचं पुन्हा मूल्यांकन केलं जाणार असल्याचं तेम्हणाले.
धर्मा पाटिल यांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केली. मागण्या पूर्ण करण्याचं कुटुंबियांना त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यांना योग्य मोबदला मिळेल आणि अन्याय होणार नाही याची सरकार खबरदारी घेईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.