नवी दिल्ली। राष्ट्रीय पातळीवरील महिला नेमबाज तारा शाहदेवचा पती, रंजीत सिंग कोहली उर्फ रकीबुल हसनवर पत्निचा छळ केल्या प्रकरणाची चौकशी करणार्या सीबीआयने मंगळवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख करण्यात आले. सीबीआयच्या मते रकीबुल आणि त्याची आई तारा शाहदेववर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती करत होते.
ताराच्या सासूने तर तिल धमकीच दिली होती, तु इस्लाम कबुल केला नाहीस तर तुझा बिछाना तोच राहिल पण त्याच्यावरचे पुरुष बदलत राहतील. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती फहीम किरमाणी यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सीबीआयने रकीबुल आणि त्याच्या आईने ताराचा कसा छळ केला याचा लेखाजोगाचा मांडला आहे. न्यायमूर्ती फहीम किरमाणी यांच्या विशेष न्यायालयात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. फसवणूक करुन रकीबुलने ताराशी हिंदू पद्धतीने विवाह केला होता. पण खोटेपणा उघड झाल्यावर रकीबुल आणि त्याच्या आईने ताराचा छळ करण्यास सुरुवात केली. ताराला मानसिक त्रास, छळ करुन तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला. सीबीआयने 2015 मध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली. यातील मुख्य आरोपी रकीबुल हसन 27 ऑगस्ट 2014 पासून जेलमध्ये आहे. तर त्याची आई जामिनावर बाहेर आहे.