नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक तोंडावर असतांना राम मंदिराचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत विधेयक तयार करण्यात यावे या मागणीसाठी आज रामलीला मैदानावर विश्व हिंदू परिषदेने धर्म सभा घेतली आहे. लाखो हिंदू बांधव या धर्मसभेला उपस्थित आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी देखील या धर्म सभेला उपस्थित आहे. विशेष म्हणजे आरएसएसकडून कोर्टाने जनभावनेचे आदर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. न्यायालयाने प्रतिष्ठा राखून ठेवली पाहिजे, न्यायालयावरचा विश्वास कायम राहिला पाहिजे असे यावेळी सांगण्यात आले आहे.