Pimpalgaon Hareshwar police custody of thieves in daring house burglary पाचोरा : पिंपळगाव (हरेश्वर) येथील जिओ सर्विस सेंटरमधून चोरट्यांनी दोन लाख 12 हजारांचे मोबाईल, टॅब, लॅपटॉप, इंटरनेट राऊटर लांबवले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. राहुल दिगंबर राउतराय (निंभोरी, ता.पाचोरा) व किरण बल्लु पवार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस हवालदार राकेश खोंडे, रणजीत पाटील, गोकुळ सोनवणे, पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा, अरुण राजपूत, शिवनारायण देशमुख, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, अभिजीत निकम, संभाजी सरोदे, पंकज सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, विनोद पाटील आदींच्या पथकाने केली.
अन्य दोन गुन्हे उघडकीस
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दाखल दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यातील आरोपी शिवानंद दत्तात्रय महाजन यास अटक करण्यात आली. आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.