फैजपूर । धाडी नदीपात्राचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सुशोभिकरणाच्या कामात अडथळा ठरणारी घरे हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने संबंधितांना नोटिस बजावली आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दोन कोटी रूपये खर्च करून फैजपूर पालिकेने धाडी नदीपात्राच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. संरक्षण भिंत, घाटाचे बांधकाम, वृक्ष लागवड अशी कामे प्रस्तावित आहे. तसेच श्रीराम चित्रपट गृहापासून ते लक्कड़पेठ पुलापर्यंत रस्त्याचे काम होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून या कामाला सुरुवात झाली आहे. या सुशोभीकरणशच्या कामामुळेम शहराच्या सौदर्यात अधिकच भर पडणार आहे. फैजपूर हि ऐतिहासिक नगरी असल्यामुळे याठिकाणी पर्यटनाला देखील चालना मिळू शकते. मात्र रस्त्याच्या कामात नदीपात्रालगतच्या 15 ते 20 घरांचा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने संबंधितांना नोटिस बजावली आहे. या परिसरातील घरे आणि ओट्यांचे बांधकाम रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असल्याने पालिकेने सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याची सूचना नोटिसद्वारे दिली आहे. नोटिस मिळालेल्या नागरिकांनी सोमवार 15 रोजी पालिकेतील बांधकाम विभाग गाठून आपली व्यथा मांडली. मात्र, याबाबत पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.