धानोरा ग्रामपंचायतला महिलांनी ठोकले कुलूप

0

महिनाभरापासून दुषित पाणीपुरवठा; महिला शौचालयाची दुर्गंधीचे दिले कारण
धानोरा – येथील तडवी वाड्यातील महिलांसह पुरुषांनी शुकवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीस कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला. तर या भागात गेल्या महिनाभरापासून दुषित पाणीपुरवठा होतो आहे . तसेच या दोघ वाडयाजवळ महिला शौचालय असून त्याची दुर्गंधीने हा परिसर त्रस्त असल्याचे यांचे म्हणणे आहे. तसेच याबाबत तोंडी व लेखी तक्रार ग्रामपंचायतकडे केलेली आहे. परंतू त्याची दखल घेतलेली नसल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रा.पं.ला कुलूप ठोकले. याआधी ग्रामपंचायत सदस्यांनी पाहणी केली असता महिलांनी दुषित पाणी बाटलीमध्ये भरून दाखविले होते त्यानंतर काही लिकेज शोधून बंद करण्यात आले होते परंतू काही दिवसात पुन्हा दुषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. तरी ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायतीस कुलूप लावतांना शाबजान तडवी, हपशान तडवी, हसीना फकीर, मुमताज तडवी, अमीना तडवी, आरीफा तडवी, मुबारक तडवी, इमाम तडवी, रसुल तडवी, नजमा तडवी, आत्माराम बोदडेसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.