धानोरा येथून सत्पंथ पदयात्रेस सुरुवात

0

फैजपूर ।सालाबादप्रमाणे यावर्षीसुध्दा सतपंथ ज्योत मंदिर धानोरा (महाराष्ट्र) ते प्रेरणापीठ पिराणा, अहमदाबाद (गुजरात) पायी पदयात्रा मंगळवार 14 पासून धानोरा मंदिर संंस्थान येथे दिव्यज्योत दर्शन तथा महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज यांचा आशिर्वाद घेण्यासाठी पदयात्रेतील भाविक आले होते. या पदयात्रेत महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज भजनी मंडळासह वाजतगाजत मंदिर ते बसस्थानक पर्यंत पायी चालत आले.

पिराणा येथे होईल पुर्णाहुती कार्यक्रम
ही पदयात्रा 28 मार्च रोजी पिराणा येथे पोहचेल व पुर्णाहुती होईल. या पदयात्रेत धानोरा तथा परिसरातील असंख्य भाविकभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.