धानोरा येथे अपघातात मोटारसायकलस्वार ठार

0

अडावद। चोपडा तालुक्यातील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य महामार्गावरील धानोरा येथे जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर बोलेरो पिक अप व मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला. ही घटना रविवारी 4 रोजी दुपारी 1-30 वाजेच्या सुमारास ही घडली. मृत गजानन पंढरीनाथ कोळी हे जळगाव तालुक्यातील विदगाव येथील रहिवासी आहे. गजानन हा मोटारसायकल क्रमांक एम.एच.19 ए.व्ही. 2944 ने किनगावकडुन चोपड्याकडे जात होता. समोरुन येणार्‍या मालवाहु बोलेरो पिक अप क्रमांक एम.एच. 19 एस. 6252 वरील चालक नईमोद्दीन मोहीयोद्दीन शेख (वय- 38 रा. चोपडा) याने मोटारसायकल स्वार कोळी यास जबर धडक दिली.

जखमीला तात्काळ 108 ने क्रमांकाच्या रुग्णवाहीकेने जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. मालवाहु वाहन चोपडा येथून किनगावला पाईप घेवुन जात होते. घटनेची खबर मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, सहाय्यक फौजदार गरबळ सोनवणे, ज्ञानदेव कोळी हे घटनास्थळी दाखल झाले. मालवाहु वाहन चालक नईमोद्दीन शेख यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी धानोरा पोलीस पाटील यांच्या खबरीवरुन अडावद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.