धानोरा । यशोधरा बौद्ध विहारात वैशाखी पोर्णिमा सायंकाळी 7 वाजता सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांनी विहारात बुद्ध पुजा हा सामुहिक वंदना घेण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सुदाम करंकाळ यांनी बौधिका पोर्णिमानिमित्त संपूर्ण कार्यक्रमाची विधी संपन्न केली. व त्याचप्रमाणे आंबेडकर नगरपासून ते आंबेडकर पुतळापर्यंत रॅली काढण्यात आली. व त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याचे विधी अनावरण करण्यात आली. व सामुहिक वंदना घेण्यात आली.
तालुक्यातील समाज बांधवांसह मान्यवरांची उपस्थिती
प्रमुख पाहुण्याचे उपस्थिती त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे भारतीय बौद्ध महासभेचे चोपडा तालुका अध्यक्ष सुदात करंकाळ व आयु अशोक रामदास शिरसाठ ता. कोषाध्यक्ष आयु महेंद्र सोनवणे, ता. सचिव व तालुका कार्यकारी मंडळ चोपडा यांनी उपस्थिती दिली व त्यांचे पंचशिल तरूण मित्र मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सुत्रसंचालक म्हणून संदीप पवार व आभार डिगंबर सोनवणे व त्याच प्रमाणे समाज बांधव रविंद्र साळुंखे, रविंद्र शिरसाठ, पांडव गुरूजी, विश्वासराव साळुंखे, सुरेश इंगळे, देविदास साळुंखे, सुकदेव शिरसाठ, वसंत सोनवणे, नकुल भालेराव, विकास शिरसाठ, राहुल पवार, ललित साळुंखे, अतुल शिरसाठ, रविंद्र घोलप आदींनी परिश्रम घेतले व कार्यक्रम संपन्न झाला.