धानोरा। विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अनिल महाजन यांची तर उपाध्यक्षपदी मेहरबान तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विकास संस्थेचे संचालक गणेश धनगर, प्रभाकर महाजन, जितेंद्र महाजन, प्रसन्न महाजन, विकास महाजन, हिरामण पाटील, हितेंद्र पाटील, पुंडलिक पाटील, रतिलाल पाटील, नलीनी महाजन, सुभद्राबाई महाजन हे उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय गरूळ यांनी काम पाहिले. त्यांना डी. आर. पुरोहीत यांनी सहकार्य केले. याप्रसंगी पंस माजी उपसभापती माणिक महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सरपंज ज्योती महाजन, वामन महाजन, जगनराव पाटील, रोहीदास साळुंके, रज्जाक तडवी, पंस सदस्य कल्पना पाटील, पोलीस पाटील दिनेश पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रोहीदास साळुंखे आदी उपस्थित होते.