धानोरा । येथील ग्रामपंचायत महिला सरपंच किर्ती किरण पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या 14 सदस्यांनी चोपडा तहसीलदार यांच्याकडे अविश्वासाचा ठराव 7 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला. धानोरा ग्रामपंचायत सदस्य संख्या एकुण 17 असून त्यापैकी 14 सदस्यांनी सरपंच किर्ती पाटील ह्या आम्हास विश्वासात घेत नाही, अरेरावची भाषा वापरतात, त्यांना गावाचे हित नाही, मिटींगमध्ये हिशोब सांगत नाही, स्वच्छ अभियान राबवित नसून कर्तव्यास कसूर करित असल्याचा ठपका ठेवून चोपडा तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.
या ठरावावर उपसरपंच अशोक साळुंखे, रामदास पारधी, राजमल महाजन, प्रकाश माळी, सुरेंद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन, मंगला पारधी, प्रा. रेखा महाजन, कुंदाबाई तडवी, नसीबा तडवी, अपेक्षा पाटील, कल्पना पाटील, धनुबाई कोळी यांनी स्वाक्षर्यासह उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान तहसीलदार यांनी ठराव पडताळणीसाठी 13 डिसेंबर रोजी धानोरा ग्रामपंचायतीत जावून सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेत काय होणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. तर पुढील सरपंच कोण? याची उत्सुकता गावकर्यांना लागून आहे.