धानोरीत पालिकेच्या ई-लर्निंग स्कूलचे भूमिपूजन

0

धायरी । प्रभाग क्रमांक 1 कळस-धानोरीमधील स.नं. 29 मुंजाबावस्ती येथे महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या विकासनिधीतून प्रभागातील पहिली सेमी इंग्लिश ई-लर्निंग स्कूल विकसीत करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी नगरसेवक मारुती सांगडे, नगरसेविका किरण निलेश जठार, मोहनराव शिंदे-सरकार, धनंजय जाधव, सागर म्हस्के, विकास टिंगरे, बाबुराव टिंगरे, गणेश टिंगरे, रामदास चौधरी, नितीन उत्तरेम, कुणाल गरसुंद, विठ्ठल कोथेरे, सुरेश बर्गे, नितीन वाणी, तपासरंजन दास, प्रदीप टिंगरे, माणिक खेसे, स्वप्नील टिंगरे, मारुती देवरे, प्रविण दोडके, संतोष टिंगरे, सुनील काळे, मंदा जठार, अविनाश सकुंडे, गोपाळ पाटील, अतुल वैराट यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्या माध्यमातून 22 गुंठे जागेत विकसित करण्यात येत असलेल्या दुमजली स्कूलच्या इमारतीमध्ये एकूण 14 वर्गखोल्या असून 1 शिक्षक खोली (स्टाफरूम), प्रशस्त मल्टीपर्पज हॉल, सुसज्ज संगणक कक्ष, प्रोजेक्टर रूम आहेत. विद्यार्थ्यांना खेळासाठी भव्य खेळाचे मैदान विकसीत करण्यात येणार आहे. शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शाळेस दोन्हीं बाजूंनी 18 व 12 मीटर रुंदीचे डीपी रस्ते आहेत. सर्व सोयींयुक्त असणार्‍या या शाळेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना पालिकेच्या माध्यमातून मोफत शिक्षणही देण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक अनिल टिंगरे यांनी दिली. नगरसेवक मारुती सांगडे यांनीही प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.