वरणगाव- वरणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील धानोरी शिवारात प्रतिभा प्रमोद सरोदे यांच्या शेतातील मका शॉर्टसर्किटने आग लागून जळाला. या घटनेत त्यांचे दोन लाखांचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी 11 वाजेच्या ही घटना घडली. तलाठी मोनीका बडगुजर यांनी पंचनामा केला. प्रतिभा प्रमोद सरोदे यांनी धानोरी शिवारातील एक हेक्टर 40 आर क्षेत्रात मका लावला होता. दोन दिवसांपूर्वी शेतातील मका कापण्यात आला होता. बुधवारी सकाळी वीज खांबावर शॉटसर्कीट झाल्याने शेतातील संपूर्ण मका जळून खाक झाला. तलाठी मोनीका बडगुजर, कोतवाल सुपडू ओंकार कोळी यांनी दोन लाखांच्या नुकसानीचा पंचनामा केला. शेतकरी प्रवीण पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र पाटील, सारंग सरोदे, नीळकंठ पाटील, सोहन इंगळे, जोगेश पाटील, राहुल पाटील, लक्ष्मण पाटील, गोविंदा पाटील, निखील इंगळे उपस्थित होते.