धानोरा- चोपडा तालुक्यातील धानोरा येथील व्यापारी महेंद्र सुरेश चौधरी यांच्या जवळील अडीच लाखांची बॅग घेऊन मोटारसायकलवरील दोघा चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना आज अडावद बाजार समितीच्या गेटजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. धानोरा येथील पारी महेंद्र सुरेश चौधरी हे मक्याचे पेमेंट घेण्यासाठी आज अडावद येथील बाजार समिती येथे गेल होते.
पेमेटची अडीच लाखांची रक्कम बॅगेत घेऊन त्यांच्या मोटारसायकलवर परतत असताना बाजार समितीच्या गेटजवळ मोटारासायकलवर आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्याजवळची पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला. काही अंतरापर्यंत महेंद्र चौधरींनी त्यांचा पाठलाग केला मात्र चोरटे निसटले. चोरट्यांच्या मोटारसायकलच्या नंबरप्लेटवर एस नावाचा उल्लेख होता.