धानोर्‍यात संगीतमय श्रीमद दशावतार कथा सप्ताह

0

धानोरा । येथे महामंडलेश्‍वर सतपंथरत्न जनार्दन हरी जी महाराज (फैजपूर) यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्रीमद दशावतार कथा सप्ताहचे आयोजन 13 ते 20 जानेवारी 2018 दरम्यान सूर्यवंशी गुजर युवक सेवा मंडळ संचलित सुखदेव भावशिंग पाटील समाज मंदिर येथे करण्यात आले. कथा सप्ताहात दररोज सकाळी 5 ते 7 यावेळेत काकडा आरती, प्रभाती कलशपूजा होणार आहे. नित्यपाठ वाचन दुपारी 1.30 ते 2 आहे, कथा दररोज दुपारी 2 ते 5 व रात्री 8 ते 10 अश्या दोन सत्रात होणार आहे. या कथा सप्ताहाचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन समस्त सतपंथी अनुयायी व ग्रामस्थ यांनी केले आहे.

असे राहतील दैनंदिन कार्यक्रम
13 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 9 ग्रंथ दिंडी मिरवणूक, सकाळी 9 ते 11 महामंडलेश्‍वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या हस्ते समाज मंदिर नूतन वास्तू कलशमहापुजा, रात्री 8 ते 10 मस्त्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार चरित्र. 14 रोजी रात्री 8 ते 10 नरसिंह अवतार, भक्त प्रल्हाद चरित्र, वामन अवतार, भक्त कमळाधेन चरित्र, परशुराम अवतार, कमळापती चरित्र, हरिश्‍चंद्र चरित्र. 15 रोजी दुपारी 2 ते 5 रामजन्मोत्सव व सीता स्वयंवर (प्रत्यक्ष तिन जोडप्यांचा विवाह सोहळा). 16 रोजी दुपारी 2 ते 5 शबरी चरित्र, रावण वध,रात्री 8 ते 10 श्रीकृष्ण जन्मोत्सव. 17 रोजी दुपारी 2 ते 5 श्रीकृष्ण लीला चरित्र, रात्री 8 ते 10 रुक्मिणी स्वयंवर. 18 रोजी दुपारी 2 ते 5 संपूर्ण महाभारत व बुद्धावतार चरित्र, रात्री 8 ते 10 पांडवांचे स्वर्गारोहण. 19 रोजी दुपारी 2 ते 5 निष्कलंकी अवतार चरित्र, रात्री 8 ते 10 निष्कलंकी अवतार. 20 रोजी सकाळी 9 ते 12 सत्कार व आशिर्वचन, दुपारी 12 ते 3 महाप्रसाद, संध्याकाळी 5 ते 7 दिंडी सोहळा मिरवणूक होणार आहे.जगतगुरु सतपंथाचार्य नानकदासजी महाराज (पिराणा, गुजरात), योगाचार्य प पु प्रेमदासजी बापू (पंचवटी, अमेरिका), प.पु. शास्त्री भक्तीकिशोरदासजी महाराज(सावदा) कथा श्रवणाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सुर्यवंशी गुजर समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.