शिरपूर:बोराडीहुन शिरपूरकडे जाणार्या टाटा कंपनीची 407 गाडीचा अॅक्सल राँड तुटल्यामुळे गाडी रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळल्याची घटना शिरपूर-बोराडी रस्त्यावरील बोराडी येथील अमरधामजवळ घडली. त्यात तीन जण जखमी झाले आहेत.
बोराडी येथे स्वस्त धान्य दुकानावर गहू व तांदूळाचा माल पोहच करण्यासाठी शिरपूरहुन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण कंपनीची 407 गाडी (क्र.एम.एच.08 एच 4758) गाडी माल खाली उतरून शिरपूरकडे जात होती. गाडीत तिन लोक होते. त्यात चालक सुकनंदन देवीदास कोळी (वय 50, रा.वाघाडी), हमाल दिनेश माळी (वय 26, रा.शिरपूर), एकाचे नाव माहीत नाही. यामध्ये चालक व एक व्यक्ती जबर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. गावातील शंशाक रंधे, भागवत पवार, शरद पाटील, निंबा पाटील आदींनी गाडीमधील जखमींना बाहेर काढून मदतकार्य केले.