मुक्ताईनगर : तालुक्यातील धाबेपिंप्री शिवारातील तांडा वस्तीमधील रहिवासी रामभाऊ जोगीलाल भिलाला (55) यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. भिलाला हे जंगलात सुकी लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते. अचानक त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. मुक्ताईनगर पोलिसात परमारसिंग भिलाला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.