गावातील तरुणांनी ग्रंथालय व अभ्यासिकेचे लोकार्पण
चाळीसगाव – तालुक्यातील धामणगाव येथे मुंबई आयकर विभागाचे उपायुक्त डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या संकल्पनेतून तसेच मार्गदर्शनातून धामणगाव गावातील तरुणांनी ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केली. डॉ. उज्ज्वल चव्हाण यांनी शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पुजन करुन वाचनालयाचे उद्घाटन केले. उपसरपंच बालाजी पवार, प्राध्यापक तुषार निकम, तंटामुक्त अध्यक्ष सुनील पवार यांच्या प्रयत्नातून गावातून निधी जमा करण्यात आला होता.
धामणगावातून अधिकाधिक तरुण अधिकारी व्हावे यासाठी ग्रंथालय, अभ्यासिका आणि वाचनालय आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. चव्हाण यांनी याप्रसंगी केले. धामणगाव येथील तरुण सचिन पवार, दिलीप जगताप, ऋषिकेश निकम, पंकज पवार, डॉ.दीपक निकम, भालचंद्र निकम, नाना जगताप, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक यांनी वाचनांलयासाठी देणगी दिली. हे गावासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमासाठी गावातिल हिरामन मोरे, मगन पवार, छगन निकम, तात्यासाहेब शितोळे, नंदकिशोर पवार, प्रलाद निकम, खंडेराव सुर्यवंशी, डॉ.फारुख शेख, साहेबराव जागताप, मोहन पिगले, रमेश पवार, रामकृष्ण चव्हाण, भिकन वाघ, वाल्मिक ठाकरे, गंभीरराव निकम, बबनराव निकम, गावातील समस्त तरुण व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.