धामणगाव येथे विद्यार्थींनीची आत्महत्या

0

जळगाव । तालुक्यातील धामणगाव येथील विद्यार्थीनीने 12 वीला कमी मार्कस् मिळाल्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. आई-वडील पेरणी करुन घरी परतल्यानंतर गळफास घेतलेल्या स्थितीत मुलीचा मृतदेह पाहताच दोघांना हंबरडा फोडला. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील सोनाली नथ्यु सपकाळे (वय 18) हीचा 12 वी निकाल नुकताच लागला होता. यात तीला 53 टक्के मिळाले. परिक्षेपुर्वी तीने जळगाव येथे क्लासेस लावले होते. चांगला अभ्यास करुनही मार्कस् कमी पडल्याने गेल्या काही दिवसांपासुन सोनाली चिंताग्रस्त होती. यातुनच तीने गळफास घेवुन जीवनयात्रा संपविली.

वडीलांची दातखिळी बसली
नथ्यु नामदेव सपकाळे हे पत्नीसोबत शेतात पेरणी करण्यासाठी गेले होते. पेरणी करुन दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास ते घरी आले. दार उघडताच मुलगी सोनाली ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने दोघांनी आक्रोश केला. यावेळी नथ्यु सपकाळे यांची काही दातखिळीच बसली होती. सोनाली हीचा मृतदेह नागरीकांच्या मदतीने खाली उतरविण्यात आला. त्यानंतर सरपंच राजु सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणला. यावेळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, डॉ.बिरासदार यांनी सोनालीला मृत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास मगन मराठे करीत आहेत.