चाळीसगाव। तालुक्यातील धामणगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीचे नुकतेच बांधकाम पुर्ण झाले असून या इमारतीचे आज सोमवारी 1 रोजी उद्घाटन होत आहे. सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळयाचे उदघाटन आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदीप देशमुख, माजी आमदार तथा जिल्हा बँक संचालक राजीव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे, पंचायत समिती सदस्य अजय पाटील, झी 24 तास चे गिरीश निकम, भूषण पाटील, उदेसिंग पवार, वाडीलाल राठोड, सहायक निबंधक ए.डी.जगताप, एस.व्ही महाजन, प्रदीप निकम, एस.टी.वाणी,, वृक्षमित्र अरुण निकम, अतुल देशमुख, प्रमोद पाटील, ओंकार चव्हाण, काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, बाजीराव दौंड, भाऊसाहेब केदार, चकोर सर, सुनील माळी, जळगाव ग स चे माजी चेअरमन रमेश निकम, प. स. सदस्य पियुष साळूंखे, शिवा भिल्ल, सुधाकर वाघ, मधुकर चौधरी, शंकर पोळ, शेखर देशमुख, दीपक पाटील, भगवान पाटील, डॉ प्रमोद सोनवणे, भूषण ब्राह्मणकर, रामचंद्र जाधव, रवींद्र चौधरी, राजेंद्र गवळी, जगदीश चौधरी, सदाशिव गवळी, सुरेश स्वार, अण्णा कोळी, फकिरा बेग, सूर्यकांत ठाकूर, शाम देशमुख, प्रदीप राजपूत, यांचे सह पिनल पवार, उत्तमराव देशमुख, भोजराज पुन्शी, बारीकराव वाघ, भाऊसाहेब जगताप, मंगेश राजपूत, बापू माळी, शेषराव पाटील, भालचंद्र निकम, बच्चू पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन विकास सोसायटीचे चेअरमन नामदेवराव निकम, व्हा.चेअरमन रामचंद्र पाटील, सचिव दीपक गढरी यांनी केले आहे.