धारीवाल महाविदयालयात फॅसिलीटीएशन सेंटर सुरू

0

जामनेर । तालूक्यातील पळासखेडे बुद्रूक येथील सुरेशचंद्र धारीवाल पॉलिटेक्नीक महाविदयालयात शैक्षणिक वर्ष सन 2017-18 पासून फॅसिलीटीएशन सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्याला डिप्लोमा इन इंजिनियरीगच्या विविध शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्व प्रथम फॅसिलीटीएशन सेंटरमध्ये जावून ऑनलाईन अर्ज भरून तो कन्फर्म करावा लागतो. त्यांनतरच डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यी पात्र ठरतो. जामनेर तालुक्यात सुरेशचंद्र धारीवाल हे एकमेव पॉलिटेक्नीक महाविदयालय असल्यामुळे तेथे फॅसिलीटीएशन सेंटरची सुविधा नव्हती.त्यामुळे विद्यार्थ्याना जळगाव किंवा फैजपुर येथील फॅसिलीटीएशन सेंटरवर जावे लागते. वद्यार्थ्याची गैरसोय दूर करण्यासाठी शैक्षणिक समन्वयक आशिष पी.पाटील यांनी वेळोवेळी शासन दरबारी कागद पत्राची पुर्तता करून शेवटी शासन मानतेनुसार शैक्षणिक वर्ष सन 2017-18 पासून महाविदयालयात फॅसिलीटीएशन सेंटर सुरू करण्यात आलेले आहे.