धार्मिक कार्यक्रमाला चक्क पवारांची उपस्थिती

0

पुणे । माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटनाला ज्येष्ठ नेते शरद पवार येणार आहेत.

साधारणत: धार्मिक कार्यक्रमाला पवार उपस्थित राहात नाहीत, अशी त्यांची प्रसिद्धी आहे. परंतु बागुल यांनी पवार यांचे मन वळविण्यात यश मिळवले आहे असे म्हणावे लागेल. यापूर्वी दोन-चार वेळा पवार यांना निमंत्रण दिले होते, तेव्हा जमले नाही तो योग यंदा जुळून आला आहे. पवार यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची उंची आणि प्रतिष्ठा वाढणार आहे असे बागुल यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.

पंचवीस वर्षात नामवंत कलाकारांनी सहभाग
शिवदर्शन येथे श्री लक्ष्मी माता मंदिरात पुणे नवरात्र महोत्सव साजरा होतो. या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि आजवर गेल्या पंचवीस वर्षात देशभरातील नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवात दिला जाणारा पुरस्कारही प्रतिष्ठेचा मानला जातो.