धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट : फुलगावच्या तरुणास अटक

भुसावळ : सोशल मिडीयावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकून एका समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील कुंदन संजय शिंदे (20) या तरुणाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

वरणगाव पोलिसात गुन्हा
संशयीत आरोपी कुंदन शिंदे याने शुक्रवारी रात्री 10.30 वाजता त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावरील अकाऊंटवर एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील या आशयाची मजकूर प्रसारीत केला होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकार्‍यांनी परीस्थिती हाताळत तातडीने आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.