धार्मिक स्थळे हटवण्याच्या वाद टोकाला

0

धुळे – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण ठरणारे मंदिर आणि प्रार्थनास्थळाचे बांधकाम महानगरपालिके वतीने काढण्यात येत आहे आज साक्रीरोडवरील मोगलाई परिसरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हनुमान मंदीराच्या भिंती चे बांधकाम काढण्यात आले. अतिक्रमण काढत असताना स्थानिक नागरिक व महापलिका कर्मचाऱ्या मध्ये शाब्दिक वाद झाला. मंदिराचे बांधकाम पाडण्यास मोठा विरोध या वेळी झाला. वाद सुरु असलेल्या घटनास्थळी न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली न करता उपस्थित युवकांनी मंदिराचे भिंत व पत्र्याचे शेढ काढून घेतले. या मध्ये मनपा अधिकाऱ्यानी मंदिराचे बांधकाम काढत नसून अतिक्रमित असलेला भाग काढू असे सागितले. दरम्यान काही भाविकांनी मंदिर काढून घेतल्यास रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा महापालिका अधिकाऱ्याना दिला.या वेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा महापालिकेच्या वतीने लावण्यात आला होता.

नागरिकांनी ठेवला न्यायालयाचा मान
आज अतिक्रमण निर्मुलन पथक कैलास शिंदे, नंदु बैसाणे, हेमंत पावटे यांच्यासह कर्मचार्‍यांना घेवून मोगलाईतील ड्रायव्हर गल्लीत असलेल्या हनुमान मंदीराचे अतिक्रमण काढण्यासाठी पोहचले. प्रारंभी नागरीकांनी वाद घातल्याने तणाव निर्माण झाला. अखेरीस मनपा अधिकार्‍यांनी आणि पोलिसांनी नागरीकांची समजूत घालून न्यायालयाच्या आदेशाने हे काम होत असल्याचे पटवून दिल्याने विरोध मावळला. त्यानंतर उभयपक्षी तोडगा मान्य होवून केवळ मंदीराच्या आजूबाजुचे पक्के बांधकाम आणि वरील पत्र्याचे शेड काढण्यास सहमती दर्शविली गेली. त्यानंतर महिलांनी मंदिराच्या सभागृहात बसून आरती म्हटली. आणि मग भाविकां मधील तरुणांनीच स्वतःहून पत्र्याचे शेड आणि मंदीराच्या आजूबाजूचे पक्के बांधकाम काढण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी घटना स्थळी जमली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनर्थ घडला नाही.

नगरसेवक परदेशी आक्रमक
शिवसेनेचे नरेद्र परदेशी मोगलाई प्रभागाचे नगरसेवक आहे. आपल्या प्रभागातील नागरीकाच्या भावना लक्षात घेऊन मंदिर रस्त्यात नसल्याचे सांगून महापालिका अधिकारी-कर्मचारी याच्या मध्ये शाब्दिक वाद झाला. या वेळी त्याचे समर्थक देखील घटना स्थळी दाखल झाले होते. मंदिर हि अतिक्रमणात आहे. आणि ते काढावे लागेल. असे महापालिका कर्मचाऱ्यानी नगरसेवक परदेशी यांना सागितले. मात्र मंदिराचे अतिक्रमण देखील काढत असल्याचे सांगितल्या नंतर मोगलाई परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. मंदिर रस्त्यात नसताना काढू देणार नाही अशी आक्रमक भूमिका नगरसेवक परदेशी यांनी घेतली होती.

आयुक्ताचा फोन बंद
महापालिकेचे कर्मचारी कार्यवाही साठी मोगलाई येथील मुख्य हनुमान मंदिराजवळ अतिक्रमण काढण्यासाठी पोहचले असता. नागरिकांचा विरोध झाला. मात्र नागरिकांनी आयुक्तान सोबत झालेल्या चर्चेत मुख्य हनुमान मंदिर न काढता रस्त्यात अतिक्रमित बांधकाम काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी मूळ मंदिर काढत असल्याचे सांगितल्या नंतर मोगलाई परिसरात वातावरण तणावाचे झाले होते. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दूरध्वनी केला असता फोन बंद येत होता. तणावाच्या वातावरणात निर्णय घ्यायचा तरी काय? असा प्रश्न महापालिका अधिकाऱ्यांना पडला होता.

मंदिराच्या नावाने हिंदू च्या भावना भडकवण्याचे काम – आमदार गोटे
पांझरा नदीच्या दोन्ही किनाऱ्यालगत होऊ घातलेल्या 75 कोटी रूपयाच्या प्रचंड खर्चाच्या कामातून खंडणीसाठी त्यांचा जीव कासावीस झाला आहे. माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी याच कामासाठी मला दिलेला 15 कोटी रूपयाचा निधी तांत्रिक कारणे दर्शवून हडप केला. आजमितीस 15 कोटी रूपयापैकी 15 रूपयाचे काम सुध्दा अस्तित्वात नाही ही वस्तुस्थिती आहे. मंदीरांच्या नावाने हिंदु धर्मीयांच्या भावना भडकवून काम थांबविण्याचे राष्ट्रवादीसेनेचे प्रयत्न हाणून पाडल्यामुळे त्यांचा जळफाट झालेला आहे. मा.मुख्यमंत्र्यांचे नांव वापरून मी अधिकाऱ्यावर दबाव आणतो. असे सांगुन स्वत:चा कमकुवतपणा सिध्द करीत आहेत. वस्तुत: मला मा.मुख्यमंत्री अथवा कुठल्याही अन्य मोठया नेत्याचे नांव वापरायची आवश्यकताच कधी पडली नाही. विरोधकांनी माझ्यावर दबंगिरी करीत असल्याचा केलेला आरोप मी पुर्णपणे स्विकारतो. कारण दबंगिरी ही सज्जनांना विरोधी नाही तर, समाजातील मस्तावल आहेत.