धावण्यात सलमान खानने घोड्यालाही हरविले…व्हिडियो बघा

0

मुंबई : घोड्यासोबत शर्यत लावली घोडाच जिंकेल हेच उत्तर येईल. परंतु बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने हा अंदाज खोटा ठरवला आहे. सलमान खान वर्कआऊट करताना वेगवेगळ्या गोष्टी करण्यावर भर देतो. यातूनच घोड्यासोबत शर्यत लावण्याची कल्पकता त्याच्या डोक्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान घोड्यासोबत रेस लावताना दिसत आहे. घोडा फिनिशींग लाईन पार करण्याच्या काही क्षण आधी सलमान अंतिम रेषेला पोहचला. म्हणजेच सलमानने ही रेस जिंकली.

हा व्हिडिओ कधी शूट करण्यात आला, याची माहिती उपलब्ध नाही. सलमानने अनेक चित्रपटांमध्ये घोडेस्वारी केली आहे. व्हिडिओमध्ये बॅकग्राऊण्डला ‘सुलतान’ सिनेमातलं गाणं लागलं आहे, मात्र सलमानचा लूक पाहता हा वेगळ्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा व्हिडिओ असावा, असा कयास आहे.