भुसावळ/जळगाव : नवापूर ते जळगावदरम्यान धावत्या ट्रकमधून तीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार नशरिाबाद टोल नाक्याजवळ उघडकीस आला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन लाखांच्या मालावर चोरट्यांचा डल्ला
जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील किरण अनिल घाटे यांनी सुरत येथून त्यांच्या वाहनांमध्ये वेगवेगळ्या दुकानदार तसेच कंपन्यांचा माल भरला. सुरत येथून नागपूर येथे हा माल ते घेवून जात होते. नवापूर ते जळगावदरम्यान चोरट्यांनी ट्रकमधून विविध कंपनीचे असलेले एकूण 9 पार्सल असा एकूण 2 लाख 95 हजार 283 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्यावर ट्रकमधून मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार किरण घाटे यांच्या लक्षात आला. या प्रकरणी घाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिवार 26 मार्च रोजी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.