भुसावळ । धावत्या रेल्वेखाली आल्यामुळे दोन अनोळखी इसमांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 26 रोजी घडली़ याबाबत रात्री उशिरा लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े
अप मेनलाईनवर क़िमी़ नं ़447/17 ते 19 दरम्यान अज्ञात 60 ते 65 वर्षीय इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला़. पोलीसांनी दिलेल्या वर्णनानुसार उंची 5़5 फूट, बांधा मध्यम, रंग गव्हाळ, केस काळे-पांढरे, नाक सरळ, डोळे मध्यम, चेहरा लांबट, अंगात पांढरा व धोतर, मनगटावर लाल रंगाचा दोरा असे वर्णन आह़े ओळख पटत असल्यास लोहमार्गचे नाईक गोपाळकृष्ण सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा़. तर दुसरी घटना डाऊन मेन लाईनवर क़िमी ऩं 447/25 जवळील गेट नं 156 ‘अ’ समोर 30 वर्षीय इसमाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना 26 रोजी घडली. उंची 5़5, वर्ण काळा-सावळा, केस काळे, पांढर्या रंगाची पँट, काळ्या रंगाचा टी शर्ट असे अनोळखी मयत इसमाचे वर्णन आह़े. धावत्या रेल्वेतून पडल्याने वा रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आह़े तपास हवालदार हिरालाल जाधव करीत आहेत.