Isam, a resident of Pachora, died during the Pachora parade पाचोरा : धावत्या रेल्वेखाली आल्याने जळगावातील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा-परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान घडली होती. सुरूवातीला मयताची ओळख न पटल्याने ओळख पटवण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले होत मात्र मयताची ओळख पटली असून मुकेश बाबू झुंज (५२, मिलिंद नगर, पाचोरा) असे मयताचे नाव आहे.
धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू
पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे कि. मी. खांबा क्रमांक ३७३/२३ नजीक कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल गोपाळकृष्ण सोनवणे यांनी घटनास्थळ गाठत घटनास्थळा सविस्तर पंचनामा केला होता. मयताची ओळख पटत नसल्याने ओळख पटविण्याचे आवाहन वृत्त पत्रांसह सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात आले होते.
अखेर पटली ओळख
पाचोरा शहरातील मिलिंद नगरातील मुकेश बाबु झुंज (५२) हे शुक्रवार, २ डिसेंबरपासून घरी न आल्याने मुकेश झुंज यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेही मिळुन आले नाही मात्र पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेखाली सापडून आलेले झुंज असल्याची ओळख कुटुंबियांनी पटवली आहे.