रावेर। धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन एका अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना रविवार 26 रोजी सकाळी 7. 32 वाजेच्या सुमारास तामसवाडी रेल्वे गेट नजीक घडली. तामसवाडी रेल्वे गेटच्या अलीकडे डाऊन रेल्वेगाडी जात असतांना एका अनोळखी 40 वर्षीय इसमाने रेल्वेखाली आत्महत्या केली.
याबाबत रावेर उपअधीक्षक अकबर तडवी यांनी पोलिस ठाण्यास खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फौजदार प्रविण निकाळजे पुढील तपास करीत आहे.