वरणगाव । येथील सम्राट नगरमधील रहीवाशी नरेश लक्ष्मण गुडगेजंगम (वय 30) हे त्यांची पत्नी व मुलांसोबत बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले असतांना एका धावत्या रेल्वेने धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना बुधवार 8 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.
नरेश लक्ष्मण गुडगेजगंम (वय 30) हे त्यांची पत्नी मुलाबाळासह जळगाव येथे रेल्वेने प्रवासाचे तिकीट काढून वरणगांव रेल्वे स्थानकावर भुसावळकडे जाणारी पॅसेजर गाडीच्या प्रतिक्षेत असतांना नरेश यांला कोणत्या तरी धावत्या रेल्वे गाडीने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ट्रॅकमनने दिली घटनेची माहिती
हि घटना स्थानकावरील रेल्वे ट्रॅकमन अनिल मोरे यांच्या निर्दशनास आल्याने त्यांनी लागलीच रेल्वे स्टेशन मास्तर यांना सांगितले. यानंतर स्टेशन मास्तर यांनी भुसावळ येथील रेल्वे लोहमार्ग पोलिसांना घडलेली माहीती दिली. पोलिस पंचनाम्यात मयताच्या खिशात वरणगाव ते जळगाव रेल्वे प्रवासाचे दोन तिकीट व 200 रुपये रोख मिळून आले. रेल्वे ट्रॅकमन अनिल मोरे यांच्या फिर्यादीवरून अकसमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सम्राट नगर परिसरात शोककळा पसरली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. पुढील तपास भुसावळ लोहमार्ग पोलीस स्थानकाचे आंनदा सरोदे करीत आहे.