धावत्या रेल्वेतून कोळश्याची चौरी : चौकडीविरोधात गुन्हा

Theft of coal from railway wagons supplying coal to Deepnagar project: Case against four भुसावळ ; दीपनगर वीज प्रकल्पाला कोळशाचा पुरवठा करणार्‍या मालगाडीतून कोळसा चोरी करताना चौघे संशयीत आढळल्याने त्यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गस्तीदरम्यान आढळले संशयीत
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र महाजन (32, कजगाव, ता.भडगाव) यांच्यासह सहकारी गस्तीवर असताना संशयीत राहुल धनराज कंडारे (फुलगाव) व अन्य तिघे संशयीत हे दीपनगर केंद्राच्या पोल क्रमांक बीटीपीएस 462 च्या पोलजवळ वॅगनवर चढून कोळसा चोरी करीत असल्याची बाब मंगळवारी सकाळी 9.10 वाजेच्या सुमारास आढळले मात्र गस्ती पथकाला पाहून संशयीतांनी पळ काढला. या प्रकरणी कंडारे यांच्या तक्रारीवरून चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.