धावत्या रेल्वेतून पडल्याने भुसावळात अनोळखी तरुणाचा मृत्यू

0

भुसावळ– कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने 28 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. रेल्वे खांबा क्रमांक 421/23 अ – 25 डाऊन ट्रॅकच्या डाव्या बाजूला या तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता आढळला. या प्रकरणी बाळकृष्ण माधवराव मालवे यांनी शहर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.