वरणगाव- कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने वरणगावातील वामन नगरातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वरणगाव रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे लाईनवर बुधवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपक दत्तात्रय गायकवाड (23, रा.वामन नगर, वरणगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. वरणगाव रेल्वे स्थानकापासून काही अतंरावर रेल्वे खांब क्रमांक 456/18 जवळ त्याचा मृतदेह आढळला. स्टेशन मास्तर यांच्या खबरदारीवरुन भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनमिळावू व शांत स्वभावाच्या दीपकचे अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते शिवाय कुटुंबियांचा तो एकूलता एक असल्याने त्यांच्या मृत्यमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परीवार आहे. तपास लोहमार्गचे एएसआय किशोर वाघ व हवालदार नरेंद्र लोढे करीत आहेत.