बोदवड- कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने 25 ते 30 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. 29 रोजी सकाळी सात वाजेपूर्वी कोल्हाडी शिवारात खांबा क्रमांक 479/25/30 दरम्यान अनोळखीचा मृतदेह आढळला. याबाबत ट्रॅकमन प्रशांत सुरेश बोदरकर (देवधाबा) यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहेत.